Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

IND vs NZ 2nd Test: भारतीय संघात होऊ शकतात 'हे' तीन बदल; 'हा' खेळाडू करणार पदार्पण

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलँड दरम्यान आजपासून दुसरा आणि अखेरचा कसोटी वानखेडे स्टेडिअमवर सुरू होत आहे. मुंबईतील बदललेले वातावरण पाहता टीम इंडिया आपल्या संघात तीन बदल करण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीचे कमबॅक

कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे याने संघाचे नेतृत्व केले होते. भारतीय संघात विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे संघाची धुरा विराह कोहलीकडे जाणार आहे. तर, अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार असणार आहे. कोहलीशिवाय भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही संधी मिळू शकते.

नवीन खेळाडूचे पदार्पण

भारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने कानपूर कसोटीत दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. मात्र, जखमी असल्याने त्याने यष्टिरक्षण केले नव्हते. त्याच्या ऐवजी के.एस. भरत याने दोन्ही डावात यष्टिरक्षण केले होते. त्याची कामगिरीही चांगली होती. त्यामुळे भारतीय संघाकडून आज के.एस. भरत पदार्पण करू शकतो.

या खेळाडूंना वगळले जाणार?

मुंबई कसोटी सामन्यात टीम इंडिया आपल्या अंतिम संघात तीन बदल करण्याची शक्यता आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल, यष्टिरक्षक वृद्धिमान साहा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांना संघातून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि के.एस. भरत यांचा समावेश होऊ शकतो.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य टीम इंडिया:

विराट कोहली (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, के. एस. भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

from sports https://ift.tt/3Do37bz

Post a Comment

0 Comments