Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

India Enters Finals: डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरनं रचला इतिहास, फायनलमध्ये एन्ट्री, पदकाची प्रबळ दावेदार

Tokyo Olympics 2020 LIVE :  टोकियो ऑलिम्पिकमध्ये डिस्कस थ्रो प्रकारामध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला आहे. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात कमलप्रीत कौरनं 64 मीटर स्कोअर केला आहे. कमलप्रीत कौर ही भारताकडून विक्रमी स्कोअर करणारी खेळाडू ठरली आहे.  कमलप्रीत कौरनं फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. सोबतच ती पदकाची दावेदार देखील झाली आहे.

डिस्कस थ्रो प्रकारात कमलप्रीत कौरनं कमालीची कामगिरी केली. ग्रुप बीमध्ये कमलप्रीत कौरनं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर स्कोअर केला. पहिल्या प्रयत्नात तिनं  60.25 मीटर   स्कोअर करण्यात यशस्वी ठरली होती. दोन्ही ग्रुपमध्ये कमलप्रीत कौर आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आता ती फायनलमध्ये पोहोचली असून तिथं चांगली कामगिरी केल्यास भारताला अजून एक पदक मिळणं निश्चित आहे.

<a href="https://ift.tt/36VhWVw Olympics 2020 LIVE : भारताची निराशाजनक सुरुवात, अमित पंघाल पराभूत तर अतानू दासचं आव्हानही संपुष्टात

डिस्कस थ्रो- सीमा पूनिया बाहेर
डिस्कस थ्रोमध्ये भारताची सीमा पुनियाचं आव्हान मात्र संपुष्टात आलं आहे.  सीमा पूनिया फायनलसाठी क्वालीफाय करु शकली नाही. क्वालिफिकेशन राउंडमध्ये सीमा पुनिया 16 व्या नंबरवर राहिली, यामुळं तिचा टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवास थांबला आहे.

बॉक्सिंगमध्ये भारताला निराशा
बॉक्सिंगमध्ये भारताचा अमित पंघाल राउंड ऑफ 16 च्या रेसमधून बाहेर पडला आहे. अमितनं पहिला राऊंड जिंकला होता मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तो पराभूत झाला. अमित पंघालकडून भारताला पदकाची अपेक्षा होती. मात्र त्याचा टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान या पराभवासह संपुष्टात आलं आहे.

तिरंदाजीत अतानू दासचं आव्हान संपुष्टात
तिरंदाजीमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा तिरंदाज अतानू दास  राउंड ऑफ 16 मध्ये पराभूत झाला आहे.  अतानु दास आणि जपानच्या खेळाडूमध्ये रंगलेला हा सामना चांगलाच चुरशीचा झाला. शेवटच्या सेटमध्ये अतानूकडून एक चूक झाली आणि त्यानं सामना गमावला. अतानू दाससह भारताचे सर्व तीन तिरंदाज आधीच बाहेर गेले आहेत.

from sports https://ift.tt/3leJ9L3

Post a Comment

0 Comments