Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

IND vs SL 2nd T20: टीम इंडिया अडचणीत, 9 खेळाडू आयसोलेशनमध्ये, आज दुसरा टी20 सामना, 'या' खेळाडूंचं पदार्पण होणार

IND Vs SL: भारत आणि श्रीलंकेदरम्यान आज तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना होणार आहे.  टीम इंडियातील क्रुणाल पांड्या  कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर टीम इंडिया चांगलीच अडचणीत आली आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात आणखी एक खेळाडूचं पदार्पण होणार आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचं आजच्या सामन्यात खेळणं जवळपास निश्चित झालं आहे.

क्रुणाल पांड्या  कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर क्रुणाल सह भारताचे 8 खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत.  माहितीनुसार क्रुणाल पांड्या कोविड पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील 8 खेळाडूंना देखील आयसोलेशनमध्ये जाण्यास सांगितलं आहे.

पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, देवदत्त पडिकल, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम हे खेळाडू दुसऱ्या टी20 सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एकाचवेळी 9 खेळाडू आयसोलेशनमध्ये गेल्यानं टीम इंडियासमोर प्लेईंग इलेव्हनची निवड करणं कठिण झालं आहे.

ऋतुराज गायकवाडचं पदार्पण होणार

ऋतुराज गायकवाडचं आजच्या सामन्यात खेळणं जवळपास नक्की झालं आहे.  ऋतुराज गायकवाड शिखर धवनसोबत सलामीला येण्याची शक्यता आहे. मात्र मध्यक्रमात फलंदाजांची निवड करणं कठिण होणार आहे. भारतासाठी आतापर्यंत हा दौरा चांगला ठरला आहे. वनडे मालिका जिंकल्यानंतर भारतानं पहिली टी 20 मॅच देखील जिंकली आहे. दुसरा टी 20 सामना काल खेळला जाणार होता मात्र क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानं हा कालचा सामना आजवर ढकलण्यात आला.

from sports https://ift.tt/3rE66Zf

Post a Comment

0 Comments