ICC T-20 World Cup 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसी टी -20 वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार नाही हे आता निश्चित झालं आहे. टी - 20 वर्ल्ड कप आता दुबईत खेळवला जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने आज आयसीसीली दिली आहे. आता वर्ल्डकपचं वेळापत्रक आयसीसीकडून जारी केलं जाईल, अशी माहिती बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी दिली.

We will inform the International Cricket Council today that we are shifting T20 World Cup to UAE. Dates will be decided by the ICC: BCCI Secretary Jay Shah to ANI
— ANI (@ANI) June 28, 2021

टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी सज्ज
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये नुकत्याच झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाची नजर टी -20 वर्ल्ड कप जिंकण्यावर असेल. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला आयसीसीचं मोठं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे टी-20 विश्वचषक जिंकून हा दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया या स्पर्धेत आपले सामर्थ्य दाखवेल.

from sports https://ift.tt/3x7TJa4

0 Comments