Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

Jagdish Lad | मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन, 34 व्या वर्षी जगाचा निरोप

बडोदा : मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन झालं. जगदीश अवघ्या 34 वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

जगदीश लाडने कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. एवढंच नव्हे तर मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. तसंच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.

जगदीश लाडने बडोद्यात आपला छोटा व्यवसाय सुरु केला होता. त्याने स्वत:ची जिम सुरु केली होती. त्या कामासाठी तो काही दिवस बडोद्याला स्थायिक झाला होता. तिथेच त्याचं निधन झालं. त्याच्या निधनावर मुंबई बॉडीबिल्डिंग असोसिएशन, महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनने शोक व्यक्त केला आहे.

from sports https://ift.tt/3aTopTk

Post a Comment

0 Comments